बारामती शहर पोलिसांची कारवाई; दुकानफोडी करणारी महिलांची गॅंग पकडली

On: June 30, 2020 5:17 PM

बारामती:

बारामती शहरातील कापड दुकानात चोरी करणाऱ्या पाच चोरट्या महिलांच्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील आमराई वसाहतीत राहणा-या महिला आरती शंकर पाथरकर (२५), सारिका लाला भाले (३०), दुर्गा आकाश साळुखे (२५) , शकिला इस्माईल कुरेशी (२२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरात महावीर पथ येथील मे.राजस्थान सारीज दुकानाचे अज्ञात चोरटयांनी शटर उचकटून त्यातील सामान चोरी केला होता. याबाबत शहर पोलीस स्टेशनला १२ एप्रिल रोजी रितसर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस करत होते. तपासादरम्यान ताब्यातील महिला आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून १९,१६०/- रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्हयाचा तपास अजुन सुरू आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन डी.बी. पथकाने सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment