सुरज झवर आर्थिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

On: January 22, 2021 8:07 PM

जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणातील फरार संशयीत सुनील झवर याचा पुत्र सुरज झवर यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पुणे येथील पथकाने अटक केली आहे. पोलिस पथक त्याला पुणे येथे घेवून जात आहेत. दरम्यान हे वृत्त समजताच संबंधीत संशयीतांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

सुनिल झवर याने बीएचआर घोटाळा प्रकरणी नाशिक येथील शंभर कोटी मुल्य असलेली जमीन केवळ तिन कोटी रुपयात घेतल्याचा आरोप आहे. सुनिल झवर फरार असून पोलिसांनी त्याचा सुपुत्र सुरज यास ताब्यात घेतले आहे. आता सुनिल झवर पोलिसांना शरण येणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment