तरुणाचा गळफास तर वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या

On: July 1, 2020 2:35 PM

जळगाव: सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांचे उद्योग व रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नसल्यामुळे कित्येक आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत.

कामधंदा नसल्यामुळे तणावाखाली असलेल्या रितेष उर्फ राजू सुरेश पाटील (वय २३, रा.वडली, ता.जळगाव) या तरुणाने गळफास घेत आपली जिवन यात्रा संपवली. दुस-या घटनेत लहू कौतिक पाटील (वय ७०, रा.लोणवाडी, ता.जळगाव) या वृध्दाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जिवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार आज समोर आला. वाहन चालक असलेला राजू रोजंदारीने कामाला जात होता.

जिवनाला व लॉक डाऊनला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे कारण समोर येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

दुस-या घटनेतील लोणवाडी येथील लहू कौतिक पाटील (वय ७०) या वृध्दाने काल सकाळीच घर सोडले होते. सायंकाळी पाच वाजता म्हसावद-बोरनार शिवारातील लोहमार्गावर त्यांचा एक धड नसलेला मृतदेह आढळून आला. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे खाली स्वत:ला झोकून देत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वृद्धाची रेल्वे खाली आत्महत्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment