हितेंद्र ठाकुर यांच्या पुतण्यासह सीए अटकेत

On: January 23, 2021 2:50 PM

वसई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहावर छापेमारी केली होती. ईडीने आज सकाळी ठाकूर यांचा पुतण्या मेहुल ठाकूरसह संचालक सीए मदन चतुर्वेदी अशा दोघांना अटक केली आहे.

ठाकूर परिवाराचे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचे म्हटले जात आहे. या घोटाळ्यात त्यांचादेखील संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. कोट्यावधी रकमेची उलाढाल विवा उद्योग समुहात केली असल्याच्या संशयातून त्यांच्या प्रतिष्ठानांवर ईडीने छापे टाकले होते. ईडीच्या हाती काही महत्वपुर्ण दस्तावेज हाती लागल्याचे म्हटले जात आहे.

गुरुआशिष कन्स्ट्रक्शन या एचडीआयएलच्या उपकंपनीचा प्रवीण राऊत हा माजी संचालक आहे. राऊतने 95 कोटी रुपयांपैकी 1 कोटी 60 लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर वळते केले. त्यापैकी 55 लाख रुपये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला देण्यात आले होते. वर्षा राऊत यांनी चौकशीअंती ते पैसे परत केल्याचे स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment