तोरणमाळ घाटात जीप कोसळून सहा मृत्युमुखी

On: January 23, 2021 8:21 PM

तोरणमाळ : धडगाव तालुक्‍याच्या सातपुडा पर्वत भागातील तोरणमाळ घाटात 70 फुट खोल दरीत जिप कोसळण्याची घटना कोसळण्याची घटना उघडकीस आली आहे. मजुरांना घेवून जाणा-या जिपचा अपघात झाल्याच्या या घटनेत सहा मजुर जागीच गतप्राण झाले आहेत. मृत्यूची संख्या अजुन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या जिपमधे एकुण 31 मजुर असल्याचे समजते. यात एका लहान मुलीचा समावेश असल्याची माहीती मिळत आहे. खोल दरीत कोसळलेल्या मजुर प्रवाशांचा शोध सुरु आहे.
या भिषण अपघातात जिपचे सुटे भाग दरीत सर्वत्र विखुरले आहेत. या घटनेने सर्वत्र हाहाकार पसरला आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसावद पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment