बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले

On: July 2, 2020 10:09 PM

रायपूर– बलात्काराला विरोध करणाऱ्या एका  १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवंत जाळल्याची वेदनादायी घटना छत्तीसगडमध्ये आज घडली. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. राज्यातल्या मुंगेली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ही दुर्दैवी घटना घडली. 

घटनेच्या वेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. तिच्या मागावर असलेला तरुण तिच्या घरात आला. त्याने तिच्यावर जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केला. संतापलेल्या तरुणाने रॉकेल टाकून त्या अल्पवयीन मुलीला पेटवून दिले. लागलेल्या आगीत ९० टक्के भाजलेल्या मुलीला आज मृत्यू झाला. बबलू भास्कर (३०) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, उपचारा पूर्वीच तिचा आज मृत्यू झाला. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बबलू भास्करला अटक केली. त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment