वणी येथील डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

On: July 3, 2020 10:41 AM

नागपूर: ओळखीचे रूपांतर प्रेमात व लग्न झाल्यानंतर डॉक्टर पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार करून छळ केला. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण देखील केली. पतीकडून होणारा हा छळ असहय झाल्याने डॉक्टर पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवली.

उपलब्ध पुराव्याच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी यवतमाळ जिल्हयाच्या वणी येथील डॉक्टर विरुद्ध अनैसर्गिक बलात्कार, छळ, जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.पिडीत डॉक्टर पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा डॉक्टर पती आणि ती वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील मेडिकल कॉलेजमध्ये सोबत शिकत होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment