नवी मुंबई : सरकारी रिव्हाल्व्हरने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना एपीएमसी पोलिस स्टेशनमधे आज सकाळी घडली. भुषण पवार असे स्वत:वर गोळी झाडून घेणा-या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
या खळबळजनक घटनेनंतर जखमी भुषण पवार यांना तात्काळ नजीकच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्यांचे निधन झाले होते. सहायक पोलिस निरिक्षक यांनी गोळी झाडून आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नाही.
भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पोलिस दलात मोठी खळबळ माजली आहे. भुषण पवार यांचे वय अवघे 42 वर्ष होते. गेल्या एक वर्षापासून ते एपीएमसी पोलिस स्टेशनमधे सहायक पोलिस निरिक्षक म्हणून सेवारत होते.







