ट्रक उलटल्याने 15 मजुर मृत्युमुखी

On: February 15, 2021 7:35 AM

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव नजीक पपईची वाहतुक करणारे आयशर वाहन उलटल्याची घटना आज मध्यरात्री घडली आहे. या अपघाती घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असून मृतांचा आकडा कदाचीत वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. धुळे येथून चोपडा मार्गे रावेरला जाणा-या आयशर वाहनाला झालेल्या या अपघातातील बहुतांश मृत हे रावेर तालुक्यातील आहेत. सर्व जखमींना जळगाव सामान्य रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत. दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment