गुटखा किंग पुत्र तथा अभिनेता सचिन जोशी अटकेत

On: February 15, 2021 1:08 PM

मुंबई : गुटखा किंग जगदीश जोशी यांचा अभिनेता असलेला पुत्र तथा उद्योजक सचिन जोशी यास इडीने अटक केली आहे. त्याच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत. ओमकार गृप प्रमोटर्स आणि सचिन जोशी यांनी 100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. ईडीने या प्रकरणी त्याची जवळपास 18 तास चौकशी केली. इडीने त्याला अटक केली आहे.

विजय मल्ल्याचा गोवा येथील किंगफिशर व्हिला विकत घेतल्यानंतर विजय जोशी प्रसिद्धीच्या झोतात आला होता. वेळोवेळी समन्स बजावून देखील सचिन जोशी ईडीच्या चौकशीकामी हजर झाला नव्हता. त्याला दक्षीण मुंबई येथील कार्यालयात आणल्यानंतर त्याची 18 तास चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून योग्य ती उत्तरे मिळाली नाही. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.

यापुर्वी ओमकार गृपचे अध्यक्ष कमाल गुप्ता व व्यवस्थापकीय संचालक बाबुलाल वर्मा या दोघांना ईडीने मनी लॉंड्रींग प्रकरणी अटक केली आहे. मुंबईत विविध ठिकाणी ओमकार गृपचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment