म.न.पा.सफाई कर्मचा-यावर हल्ला ; शनी पेठ पो.स्टे.ला हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : म.न.पा. सफाई कर्मचा-यावर काल रात्री काही तरुणांकडून जिवघेणा हल्ला झाला. सफाई कर्मचा-यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर सर्व हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. वैद्यकीय उपचारानंतर जखमी तरुणाने शनीपेठ पोलिसात रितसर गुन्हा केला आहे.  

याबाबत वृत्त असे की विशाल कैलास सोनवणे हा मनपा सफाई कर्मचारी काल रात्री लघुशंका करण्यासाठी घराबाहेर आला होता. त्यावेळी त्याच्याजवळ दिनेश उर्फ टमाट्या, त्याच साथीदार संतोष यादव तसेच इतर दोन अनोळखी इसम आले. यातील संतोषने विशालच्या भुवईवर चॉपरने वार केला. यात विशाल जखमी झाला. त्याच वेळी दिनेश नावाच्या तरुणाने विशालच्या उजव्या कानापासून मानेपर्यंत वार केले. दरम्यान संतोष, दिनेश व इतरांनी विशाल यास फायटर व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याने तो गंभीर जखमी झाला.

जखमी विशालने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केल्यामुळे घरातील सदस्य पळत बाहेर आले. त्याला हल्लेखोरांच्या तावडीतून त्यांनी सोडवले. त्यावेळी सर्व हल्लेखोर विठ्ठलपेठ परिसराच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. जखमी विशालने वैद्यकीय उपचारानंतर शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.नि. विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रविंद्र पाटील, हकीम शेख, परिष जाधव आणी अमोल विसपुते करत आहेत.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here