माहेरी आलेल्या बालिका वधूची पित्याकडून हत्या

On: July 3, 2020 9:42 PM
crimeduniya

बीड: वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील अल्पवयीन विवाहितेचा खून पित्यानेच केल्याचे उघड झाले.  या घटनेचा उलगडा अवघ्या 24 तासात वडवणी पोलिसांनी केला. वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नराधम पित्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.वडवणी तालुक्यातील पिंपळा येथे शीतल दादासाहेब तोगे (वय १४) या अल्पवयीन विवाहितेचा मृतदेह एका उसाच्या शेतात मंगळवारी आढळून आला होता.

वडवणी पोलिस स्टेशनचे स.पो.नि. महेश टाक यांनी या खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा केला. मृत शीतलचा खून तिचे वडील प्रकाश काशीनाथ भांगे यानेच केल्याचे उघड झाले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment