मुंबईनंतर आता केरळ रेल्वे स्टेशनवर स्फोटके जप्त

On: February 26, 2021 9:53 AM

तिरुवनन्तपूरम : मुंबई येथे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानानजीक स्फोटक जिलेटीन कांड्यांनी भरलेले वाहन आढळून आल्यानंतर आज सकाळी केरळ येथील कोझीकोड रेल्वे स्टेशनवर स्फोटके आढळून आली आहेत. चेन्नई येथील एका प्रवासी महिलेच्या सिटखाली आढळून आलेली ही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. चेन्नई ते थालास्सेरी दरम्यान प्रवास करणा-या या प्रवासी महिलेस चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलेची चौकशी सुरु आहे. कोझीकोड रेल्वे स्टेशनवरील चेन्नई मंगळुरु सुपरफास्ट रेल्वेत हा साठा आढळून आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment