चित्रा वाघ यांच्या पतीविरुद्ध एसीबीने दाखल केला गुन्हा

On: February 27, 2021 12:22 PM

मुंबई : पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आवाज उचलणा-या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे.

मुंबईच्या परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयातील वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल पदावर किशोर वाघ सेवेत होते. जुलै 2016 मधे चार लाख रुपयांची लाच घेतांना त्यांना अटक झाली होती. अटकेनंतर त्यांचे निलंबन झाले होते. त्यांच्या सेवा काळात 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 दरम्यान किशोर वाघ यांच्या संपत्तीची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरु केली होती. वर्तमान सरकार सुडबुद्धीने वागत असून आम्हाला माहीती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मी कायदेशीर लढा देण्यास तयार असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment