कुसुंबा येथे दोन गटात हाणामारी

On: February 27, 2021 11:22 PM

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने दोन्ही गटातील जखमींवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एका गटाने दुस-या गटावर चाल केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एमआयडीसी पोलिसांनी पो.नि.विठ्ठल ससे यांच्या अख्त्यारीखाली नियंत्रण मिळवले आहे.

कुसुंबा येथील दीपक कोडी व अमर सोनवणे यांच्यात वाद झाला होता. यातील तिन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता याचेसह पो.नि. विठ्ठल ससे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील, सिद्धेश्वर दापकर, शांताराम पाटील, मुदस्सर काझी, गफ्फार तडवी सचिन मुंडे, मिलींद सोनवणे, मुकेश पाटील, किशोर पाटील,सुधीर साळवे यांच्या पथकाने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment