वडापावसह पाण्याच्या बाटल्या हिसकावणा-या गजा मारणेवर दरोड्याचा गुन्हा

On: March 1, 2021 4:39 PM

पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटकेनंतर रॅली काढत दहशत माजवणा-या गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता गजा मारणे व त्याच्या साथीदारांनी टोलनाक्यावर टोल दिला नाही. तसेच नजीकच्या फुड मॉलमधील वडापावसह पाण्याच्या बाटल्या जबरीने हिसकावून नेल्याचे समोर आले आहे. यावेळी मारणे याच्या समर्थकांनी आरडाओरड करत फटाके वाजवून ड्रोनच्या मदतीने चित्रीकरण करत दहशत माजवली. या प्रकरणी गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पिंप्री चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment