देवेंद्र फडणवीसांसह मुनगंटीवार, चित्रा वाघ यांच्यासह इतरांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा

On: March 1, 2021 10:13 PM

वाशिम : बंजारा समाजाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार, भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यासह इतरांविरुद्ध वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुजा चव्हाण प्रकरणाच्या माध्यमातून त्या परिवारासह बंजारा समाजाची बदनामी झाली असल्याचा आरोप बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी केला आहे. मनोरा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावे घेतली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment