भर चौकात मुलाला मारण्याची धमकी – दाम्पत्याला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

On: March 2, 2021 6:41 PM

जळगाव : भर चौकात मुलाला मारुन टाकण्याची धमकी देत दाम्पत्याला काठीने मारहाण केल्याप्रकरणी मध्यरात्री एमआयडीसी पोलिस स्टेशनला परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गटाकडून दाखल झालेल्या फिर्यादीनुसार रतीराम सावकारे, धिरज सावकारे, वृषाली सावकारे, सरोज लोखंडे, ललिता जयकर यांच्याविरोधात विनयभंगासह दंगलीचा व अनाधिकारे घरात जावून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुस-या गटातील फिर्यादीनुसार दाम्पत्याविरोधात विनयभंगासह अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment