विवाहितेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना

On: July 4, 2020 5:38 PM

पुणे: पती व मुलींना ठार मारण्याची धमकी देत तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रबोधन सुनील गोरे या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातील पिडीत महिलेचा पती व संशयीत आरोपी प्रबोधन गोरे हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे प्रबोधन याचे पिडीत विवाहितेच्या घरी नेहमी येणे जाणे होते. त्यातून दोघांची ओळख झाली होती. 6 मे रोजी पिडीत विवाहीता न-हे येथील एका दवाखान्यात उपचारासाठी आली होती.

त्यावेळी त्याने तिच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र आपण अगोदरच विवाहीत असल्यामुळे हे शक्य नाही असे ती त्याला म्हणाली होती. दरम्यान त्याने तिला एका लॉजवर नेत तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी तिने पतीला सोबत घेत सिंहगड रस्ता पोलिसात बलात्काराचा रितसर गुन्हा दाखल केला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment