पद्मालय नजीक जंगलात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

On: March 6, 2021 10:49 PM

जळगाव : आज दुपारी पद्मालय – गालापूर दरीतील जंगलात गळफास घेतलेल्या व कुजलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. सदर तरुणाचा मृतदेह गेल्या 5 – 6 दिवसापासून मृतावस्थेत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तपासाअंती या मयत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर कृष्णा चव्हाण (22) रा. बोरगाव ता. एरंडोल असे निष्पन्न झाले आहे. सदर मयत तरुण विज मंडळात कामाला होता असे देखील समजते. प्रेमप्रकरणातून या तरुणाचा घातपात झाला असल्याचे दबक्या आवाजात म्हटले जात आहे.

मयत ज्ञानेश्वर चव्हाण या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते असे म्हटले जात आहे. या प्रेमप्रकरणातून तर या तरुणाने गळफास घेतला नसावा? अथवा त्याच्या हत्येचा देखावा निर्माण केला नसावा? असे देखील म्हटले जात आहे. या तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची व तिचे लवकरच लग्न होणार असल्याची कुजबुज या निमीत्ताने सुरु होती. दरम्यान याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment