निर्दयीपणे पशुधनाची वाहतुक – एक अटकेत

On: March 7, 2021 8:41 PM

जळगाव : अकरा बैलांना निर्दयीपणे ट्रकमधे कोंबून त्यांची बेकायदा वाहतुक करणा-या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 4 लाख 30 हजार रुपयांच्या या पशुधनाची सुटका करण्यात आली आहे.

आज सकाळी उमाळा फाट्यानजीक आयशर ट्रकने (एमएच 46 एएफ 5554) अकरा बैलांची बेकायदा वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकचालकास अटक करत पशुधनाची सुखरुप सुटका केली. या प्रकरणी समाधान गुलाब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सन 2015 चे कलम 5 (अ) 5 (ब) , प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 11 ड, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 19765 चे कलम 6, 9 प्रमाणे रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने पुढील तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील तसेच योगेश बारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment