बुट विक्रेत्याची लुट करणारा जेरबंद

On: March 8, 2021 5:43 PM

जळगाव : गावोगावी बुट विक्रीचा व्यवसाय करणा-या वृद्ध इसमाची रिक्षात लुट करण-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील तपासकामी अटकेतील राहुल सुरेश आरके (24) रा. चौगुले प्लॉट कांचन नगर जळगाव यास शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुरहानपुर येथील रहिवासी बाबुराव डिगंबर निंभोरे (70) हे 20 फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात बुट विक्री करण्यासाठी जळगाव शहरात आले होते. बुट विक्री केल्यानंतर राजकमल चौक ते पांडे चौक दरम्यान रिक्षाने प्रवास करतांना रिक्षात अगोदरच बसलेल्या प्रवाशाने त्यांच्या खिशातील साडेचार हजार रुपये रोख व सॅंमसंग कंपनीचा फोन हिसकावून घेतला होता.

याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सुनिल दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन व पंकज शिंदे यांनी राहुल सुरेश आरके यास शिताफीने दाणा बाजारातून ताब्यात घेत अटक केली आहे. पुढील तपासकामी त्याला शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment