डंपरच्या धडकेत दुचाकी आदळली बसवर – एक ठार

On: March 9, 2021 2:16 PM

जळगाव : कामावर जात असलेल्या दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्या मागे डबलसीट बसणे थेट मृत्यूला आमंत्रण ठरल्याची घटना आज जळगाव शहरातील महामार्गावर घडली. मागून येणा-या डंपरने पुढील दुचाकीला धडक दिल्यामुळे ती दुचाकी पुढे धावणा-या बसमधे गेली. त्यात दुचाकीवर डबलसिट बसलेला इसम जागीच ठार तर दुचाकीस्वार जबर जखमी झाला.

सिद्धार्थ त्रंबक मोरे (57) सिंधी कॉलनी असे मृत्यूमुखी पडलेल्या प्रौढाचे नाव असून अक्षय विजय पाटील (30) शिवम नगर निमखेडी परिसर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने काहीवेळ उपस्थितांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मयत व जखमी हे दोघे जण रेमंड कंपनीत कामाला होते. नेहमीप्रमाणे दोघे इच्छादेवी चौकात भेटल्यानंतर डबलसीट सोबत रेमंड कंपनीत जात होते. नेहमीप्रमाणे आज दोघे एकमेकांना भेटले व सोबत कंपनीत जात असतांना हा अपघात घडला. त्यात एक ठार व एक जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment