मद्यधुंद कार चालक पोलिसाने उडवले महिलेला ; दिल्लीतील घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

On: July 4, 2020 9:53 PM

दिल्ली: राजधानी दिल्ली येथे काल झालेल्या एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेतील कारचालक हा पोलिस उप निरीक्षक असल्यचे म्हटले आहे. सदर कारचालक अधिकारी हा मद्यधुंद असल्याचे सांगण्यात येत आहे.  

शुक्रवारी दिल्लीतील चिल्ला गावात एका महिलेला भरधाव कारने फरफटत नेले. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणा-या महिलेला वेगवान कारने धडक दिल्याचे दिसत आहे. घटनेनंतर मुख्य आरोपीची ओळख योगेंद्र अशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यास अटक करण्यात आली असून जखमी महिलेवर उपचार सुरु असल्याचे समजते.

बघा विडियो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment