खा. अमोल कोल्हेंच्या भावाविरुद्ध पोलिसात गुन्हा

On: March 12, 2021 10:47 AM

माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील यांच्याविषयी फेसबुकवर अपशब्दाचा वापर केल्याबद्दल खा. अमोल कोल्हे यांचे बंधू सागर कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंचर पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे बंधू सागर कोल्हे यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविषयी अपशब्द असलेली पोस्ट टाकण्यात आली. याप्रकरणी मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सागर कोल्हे यांच्याविरुद्ध मंचर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment