दोघे दुचाकीचोर पोलिसांच्या ताब्यात

On: July 5, 2020 4:38 PM


जळगाव : दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील दोघा तरुणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघा चोरटयांना रामानंद नगर पोलिसांच्या ताब्यात पुढील तपास कामी देण्यात आले आहे.

जलसंपदा विभागामधील कनिष्ठ लिपीक किसन जगताप यांची टीव्हीएस ज्युपीटर (क्र.एमएच १९ सीके ९००५) दुचाकी १९ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराजवळून चोरट्यांनी लांबवली होती.

सदर दुचाकी चोरीची घटना २० रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी किसन जगताप यांनी फिर्याद दाखल केली होती. रामानंदनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.

सदर घटनेतील संशयित चोरांबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाली. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाचोरा तालुक्यातील निभोंरी येथून संशयित आरोपी संदीप बापूराव चव्हाण (३०) आणि चिंचपुरा येथील गोकुळे रामदास राखपसरे (२७) यांना ताब्यात घेतले. दोघा चोरट्यांकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment