संशयीत मालट्रक चोरास पकडले

On: March 14, 2021 7:52 PM

जळगाव : गेल्या महिन्यात एमआयडीसी परिसरातील सुप्रिम कॉलनी येथून मालट्रक चोरीची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी सद्दाम हुसेन बशीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, इमरान सैय्यद, सुधीर साळवे, मिलींद सोनवणे, सचिन पाटील यांच्या पथकाने शेख अजिज शेख वहाब यास अजिंठा चौफुलीवरुन तो धुळे येथे पळून जाण्याच्या बेतात असतांना अटक केली आहे. अटकेतील अजिज याने ट्रक चोरीची कबुली देत या गुन्ह्यात अजून दोघांचा यात सहभाग असल्याचे देखील कबुल केले आहे. त्याला न्या. शेख यांच्या समक्ष हजर केले असता 16 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. इतर दोघा फरार आरोपींचा व मुद्देमालाचा शोध सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment