दरमहा 100 कोटीच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्र्यांनी दिले होते वाझेंना – परमबीर सिंहांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

On: March 20, 2021 7:35 PM

मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलेले नाराज पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केल्याचे वृत्त टाईम्स नाऊ या वृत्तवाहीनीने केले आहे. या वृत्तवाहीनीने म्हटले आहे की राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दीष्ट दिले होते.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरुन बदली करण्यात आल्यामुळे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्राच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. आठ पानी पत्रात सिंह यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. सध्या निलंबीत करण्यात आलेले स.पो.नि. सचिन वाझे यांना पोलिस खात्यात घेतल्यानंतर त्यांना वसुलीचे कसे टार्गेट अर्थात उद्दीष्ट देण्यात आले होते यासह कुणीकुणी वाझेंना काय सांगितले याची खळबळजनक माहिती या पत्रातून देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना हॉटेल, बार यासह इतर आस्थापनांकडून महिन्याकाठी शंभर कोटी रुपयांची वसुली करण्याचे काम दिले होते असे पत्रात नमुद केले आहे. परमबीर सिंह यांना देण्यात आलेली गृहरक्षक दलाची जबाबदारी ही डीजी रॅंकमधील अखेरचे पद असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment