एखाद्या अपघातात मृत्यु झाल्यास विम्याची प्रस्तावित रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. मात्र मद्य प्राशन केल्यानंतर अपघाती मृत्यु झाल्यास विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी कंपन्यांची नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हिमाचल प्रदेशातील सिमला येथे सन 1997 मध्ये एका चौकीदाराचा मृत्यू झाला होता. अति प्रमाणात मद्यसेवन केल्यामुळे चौकीदाराचा मृत्यु झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. सदर मृत्यु अपघाती मृत्युच्या श्रेणीत येत नसल्याचे दिसत नाही त्यामुळे विमा कंपनीवर प्रस्तावित रक्कम देण्याची जबाबदारी येत नसल्याचा निकाल राष्ट्रीय ग्राहक मंचाकडून देण्यात आला होता. या निकालाविरुद्ध चौकीदाराच्या वारसाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्या. शांतानागौर आणि न्या. विनीत शरण यांच्या खंडपिठासमक्ष या याचिकेवर कामकाज झाले. खंडपिठाने राष्ट्रीय ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत याचिका निकाली काढली.