विद्येच्या प्रांगणात दारु आणि बियरच्या बाटल्या

On: March 24, 2021 10:40 AM

पाचोरा : पाचोरा तालुक्यातील कुरंगी नविन माध्यमीक विद्यालय जणू काही दारु पिणा-यांचा अड्डा झाल्याचे एका घटनेत दिसून आले आहे. या विद्यालयाच्या आवारात काही नागरिकांनी दारु पिऊन धिंगाणा घातल्याचे उघड झाले आहे. शाळेच्या आवारात दारु आणि बियरच्या बाटल्यांसह पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास असा एवज आढळून आला आहे. रात्रीच्या अंधारात कुणीतरी टवाळखोरांनी शाळेत दारु पिऊन धिंगाणा घालत शाळेचे किरकोळ नुकसान देखील केल्याचे दिसुन आले आहे. दारु पिऊन धिंगाणा घालणारे याच शाळेचे माजी विद्यार्थी असण्याची देखील दाट शक्यता काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या घटनेची माहिती समजल्यानंतर कुरंगी गावचे सरपंच पती गणेश संतोष पाटील. उपसरपंच शालिग्राम बाजीराव पाटील, सदस्य योगेश शांताराम पाटील, पत्रकार नगराज पाटील, पंढरीनाथ पाटील, दिनकर सोनवणे, अविनाश कोळी आदींसह माध्यमिक शिक्षक व कर्मचारी वर्गाने पाहणी केली. यापुढे जो कुणी असा गैरप्रकार याठिकाणी करेल वा आढळून येईल त्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment