वसुलीसाठी कर्मचा-याचे अपहरण,मारहाण

On: July 6, 2020 10:06 PM

पुणे :  कार्यालयीन कामानिमित्त दिल्ली येथे गेलेला व्यवस्थापक लॉकडाऊन सुरु झाल्याने तेथेच अडकला. दरम्यानच्या काळात कार्यालयाने दिलेले पैसे दिल्ली मुक्कामात खर्च झाले. परत आल्यावर मालकाने सतरा दिवस हॉटेलात क्वारंटाईन होण्यास सांगितले. हॉटेल सोडतांना पैसे नसल्यामुळे त्याने फोन व डेबीट कार्ड तारण ठेवत सुटका करुन घेतली.

या सर्व घडामोडीनंतर मालकाने त्याला कार्यालयाचे पैसे परत मागीतले. जवळ पैसेच नसल्यामुळे मालकाने आपले पैसे वसुल करण्यासाठी व्यवस्थापकाचे तिघांच्या मदतीने चक्क अपहरण केले. एवढेच नाही तर त्याला मारहाण देखील केली. त्यानंतर त्याच्या गुप्तांगावर सॅनेटायझर फवारले असा व्यवस्थापकाचा आरोप आहे. वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल झालेल्या कंपनी व्यवस्थापकाने दौंड पोलिस स्टेशनला मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी कुणालाही अटक नसून तपास सुरु आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment