ऑक्सिजन टॅंकला नाशकात गळती

On: April 21, 2021 1:45 PM

नाशिक : नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पीटलमधील ऑक्सिजन टॅंकच्या पाईप लाईनला आज बुधवारी 21 एप्रिल रोजी साडेबारा वाजता गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहीती समजताच अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा पुरेपुर प्रयत्न सुरु केला. अनेक गंभीर रुग्णांना दिला जाणारा ऑक्सीजन या गळतीमुळे वाया गेला आहे. अगोदरच ऑक्सीजनची कमतरता असतांना गळतीमुळे परिसरात घबराट पसरली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment