दुचाकीचोर एलसीबीच्या जाळ्यात

On: July 7, 2020 7:03 PM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यांना वाकोद ता. जामनेर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीतांनी या दुचाकी निफाड व आडगाव (नाशिक) येथून चोरल्या आहेत.किरण मोहन इंगळे (गोसावी नगर वाकोद-जामनेर) व सागर गणेश उमटे (वाकोद-जामनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, नंदलाल पाटील सचिन महाजन दत्तात्रय बडगुजर भगवान पाटील प्रकाश महाजन गफुर तडवी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment