कोरोना रुग्णाची आत्महत्या

On: July 7, 2020 7:29 PM

पुणे : कोरोना चाचणी पोझिटिव्ह आल्यापासून तणावात असलेल्या 55 वर्षीय रुग्णाने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना काल पुण्यात घडली.
एका महाविद्यालयात क्वारंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे.

कोंडवा पोलिसांनी आज सांगितले की, होस्टेलच्या एका रुममध्ये मयत रुग्णाचा मुलगा व इतर दोघांना ठेवण्यात आले होते. हे तिघे नाश्ता करण्यासाठी रुमच्या बाहेर गेले होते. सकाळी परत आल्यावर त्यांना रुग्ण गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.घटनास्थळावर पोलिसांना सुसाइड नोट मिळाली नाही, त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment