भुसावळ शहरात खूनाची घटना

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : भुसावळ शहरातील आगवाली चाळ परिसरात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आज शनीवारी भर दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने भुसावळ शहर व परिसरात खळबळ माजली आहे.

सुनिल अरुण इंगळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव समोर आले असून त्याची हत्या कुणी व का केली याचा उलगडा होणे बाकी आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह उप अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here