सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईची पुण्यात हत्या

काल्पनिक छायाचित्र

पुणे : काही दिवसांपुर्वी पुणे येथील बुधवार पेठेत सहायक फौजदाराची हत्या झाली होती. या हत्येची रक्तरंजीत घटना ताजी असतांना आज सहायक पोलिस निरीक्षकाच्या आईची हत्या झाली आहे. या घटनेने पुणे शहर व जिल्ह्यात खळबळ माजली आहे. वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भाजी मंडईजवळ आज शनिवारी 8 मे च्या पहाटे 4 वाजता ही घटना घडली असून उघडकीस आली आहे.

सातारा पोलिस दलातील सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांची आई शाबाई अरुण शेलार (65) ,रा. रामनगर यांची अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉड मारुन हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शाबाई यांचा भंगार विक्रीचा व्यवसाय असून एका भंगार व्यावसायीकाच्या हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here