जळगावात विनामुल्य अ‍ॅन्टीजेन तपासणी शिबीर

जळगाव : शिवसेना जळगाव महानगर व इंडीयन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना(कोविड -19) अ‍ॅन्टीजेन तपासणी शिबीराचे विनामुल्य आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यास वा जाणवत असल्यास कुणीही घाबरुन जाण्याचे कारण नाही.

रविवार दि. 9 मे 2021 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पडकी विहीर, चिंचेच्या झाडाजवळ, तुकारामवाडी- गणेशवाडी, जळगाव येथे हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. डॉ.प्रमोद खिवंसरा या शिबीरात निशुल्क सल्ला व मार्गदर्शन देणार असल्याचे युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक तथा शिवसैनिक विराज कावडीया यांनी कळवले आहे. अधिक माहितीसाठी 9405446632 व 9588411488 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here