“इंटरनॅशनल नॉईज अवेअरनेस डे” उत्साहात

जळगाव : “इंटरनॅशनल नॉईज अवेअरनेस डे” (आंतरराष्ट्रीय सुरक्षीत ध्वनी दिवस) आज जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माहितीपर भित्तीपत्रकांचे वितरण आणि अनावरण करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, जळगाव शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे उप प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, सहायक आयुक्त समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, उद्योजक किरण बच्छाव, कथ्थक शिक्षिका डॉ. अपर्णा भट – कासार, व. वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष तथा सी. ए. अनिलकुमार शहा यांच्या हस्ते या भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले.

विविध संस्थाप्रमुखांना, रिक्षासह इतर वाहन चालकांना या माहितीपर भित्तीपत्रकांचे वितरण यावेळी करण्यात आले. जळगाव शहरातील सर्वच दवाखान्यांमधे ही भित्तीपत्रके लावण्यात आली. जनजागृतीसाठी हा कार्यक्रम राबवला जात असतांना योगायोगाने यावेळी बैलगाड्या मार्गक्रमण करत होत्या. हॉर्न नसलेल्या सर्वोत्कृष्ट दळणवळणाची वाहने म्हणुन या बैलगाड्यांची यावेळी नोंद घेण्यात आली तसेच या बैलगाडी चालकांचा सन्मान देखील करण्यात आला. बरेचसे नागरिक यावेळी कुतूहलापोटी या मोहिमेत सहभागी झाले.

ध्वनी सजगता ही एक सामूहिक सामाजिक बांधिलकी असून त्यावर विविध क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन काम  करण्याची गरज यावेळी डॉ. अनिता भोळे यांनी व्यक्त केली. याकामी डॉक्टरांचे सहकार्य सदैव उपलब्ध राहील याची त्यांनी यावेळी ग्वाही दिली. याप्रसंगी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयएमएच्या प्रत्येक सदस्याने  मतदानाचा अधिकार बजावण्याचा तसेच अधिकाधिक लोकांमध्ये मतदानाची जनजागृती  करण्याचा निर्धार देखील व्यक्त करण्यात आला. प्रत्येकाने मतदान करुन सुदृढ  लोकशाहीसाठी आपले योगदान देण्याचे आवाहन योगेश पाटील यांनी यावेळी केले.

आयएमए महाराष्ट्र राज्य हॉस्पिटल बोर्ड इंडियाचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, आयएमए महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. विलास भोळे, कान नाक घसा संघटनेचे डॉ. देविदास सरोदे आयएमएचे ज्येष्ठ आणि इतर सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. डॉ. सुनील गाजरे, डॉ. अनिता भोळे, डॉ. पंकज पाटील, डॉ. भरत बोरोले, डॉ. वैशाली आणि डॉ. अतुल चौधरी, डॉ. अविनाश भोसले, डॉ. धीरज चौधरी, डॉ. दीपक पाटील, डॉ. रेणुका चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here