लसीकरण झालेल्या नागरिकांनी मानले सचिन सोमवंशी यांचे आभार

पाचोरा : पाचोरा शहरात कोविशिल्ड व्हॅक्सीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतांना अपुरी यंत्रणा व तोकडे मनुष्यबळ या कारणामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. पाचोरा शहरातील कॉंग्रेसचे धडाडीचे, आघाडीचे व दमदार नेतृत्व समजले जाणारे सचिनदादा सोमवंशी यांना लसीकरणासाठी ताटकळत बसलेल्या नागरिकांची व्यथा बघवली गेली नाही. अ‍ॅक्शन मोड मधे येत सचिन सोमवंशी यांनी मैदानात उतरत यंत्रणेला कामाला जुंपले.

पाचोरा शहरात केवळ पंचायत समिती सभापती निवासस्थानी कोवीड लसीकरणाचे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात केवळ शंभर नागरिकांनाच लसीकरण केले जात असल्याची बाब सचिन सोमवंशी यांनी हेरली. गेल्या दोन दिवसांपासून कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांना संपर्क करत संवाद साधला. लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असतांना त्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत दिल्या गेल्याच पाहिजेत असे सचिन सोमवंशी यांनी डॉ. जमादार यांना सांगितले. याशिवाय संतप्त झालेल्या लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची सचिन सोमवंशी यांनी समजूत घातल्यानंतर नागरिक शांत झाले. उसळलेला जनक्षोभ केवळ सचिन सोमवंशी यांच्यामुळे शांत झाला. लसीकरण मोहीमेत जिल्ह्यातील वरीष्ठ अधिका-यांनी स्थानिक लसीकरण केंद्र जास्तीत जास्त प्रमाणात सुरु करावे अशी मागणी कॉग्रेसच्या वतीने सचिन सोमवंशी यांनी याप्रसंगी केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here