लाभार्थ्यांना कोविड उपचाराचे पैसे परत द्यावे – मुंबई उच्च न्यायालय

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोविड उपचार घेतलेल्या रुग्णांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. कोविड उपचारासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णंना त्यांच्या बिलाची रक्कम परत मिळणार आहे. ज्या खासगी रुग्णालयांनी कोरोनाग्रस्त रुग्णांकडून बिले आकारली ती परत मिळण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे स्पष्ट निर्देश औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आले आहेत.

या योजनेच्या अंतर्गत रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत करण्याबाबत राज्य शासनाने काय कार्यवाही केली याबाबतचा तपशील सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच रुग्णालयांवर काय कारवाई केली याचा देखील तपशील सादर करण्यात यावा असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत काही रुग्णालयांनी रक्कम घेतल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. याबाबत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने निर्णय दिला आहे.

ज्या खासगी रुग्णालयात रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेतला आहेत्या रुग्णालयाचे बिल, मेडिकलच्या पावत्या, रुग्णांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, झेरॉक्स प्रत आदी कागदपत्र जोडून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्जासह देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत लाभार्थी परिवाराला प्रति कुटुंब प्रति वर्ष दिड लाख रुपयांचे विमा कवच दिले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी या योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपयांची मर्यादा आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here