सरकारी खर्चातून अजित पवारांच्या प्रसिद्धीसाठी होणार सहा कोटी रुपयांची उधळपट्टी

मुंबई : राज्यात कोरोनाने हाहा:कार माजवला असतांना व सरकारी तिजोरीत खडखडाट होत असतांना राज्य शासनाने अनेक खर्चांना कात्री लावली आहे. संसद भवनाचे नव्याने सुरु असलेले सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम थांबवण्यात यावे अशी मागणी विविध विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला केली आहे. असे असतांना देखील आपली सामाजीक प्रतिमा उंचावण्यासाठी सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार तब्बल सहा कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. हा खर्च सरकारी खर्चातून करणार असल्याचा घाट घातला जात आहे.

राज्यात अनेक विकासकामे निधी अभावी अनिश्चित काळासाठी रखडले आहेत. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण देखील रखडले आहे. त्यातच उप मुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची प्रसिद्धी सोशल मिडीयाच्या (फेसबुक, ट्विटर, ब्लॉगर, इन्स्टाग्राम, यु ट्युब) माध्यमातून व सरकारी खर्चातून करणार आहेत. याकामी खासगी कंपनीची नेमणूक केली जाणार आहे. या कंपनीला या कामाच्या मोबदल्यात सहा कोटी रुपयांचा निधी देण्याचे प्रयोजन आहे. सामान्य प्रशासन विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, माहिती व जनसंपर्क महासंचलनालयात सोशल मीडिया हाताळण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक आणि तांत्रिक गोष्टींची माहिती असणाऱ्या लोकांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नाही. त्यामुळे हे काम खासगी यंत्रणेकडे देणे उचीत राहील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here