सामान्य माणसा तुझा ईएमआय, तुझा घरखर्च तुच पहा……….भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

मुंबई : “माझे कुटूंब, माझी जबाबदारी!…. सामान्य माणसा, नोकरदारा, बलुतेदारा, कष्टकरी मजुरा अरे….तुच आहेस तुझा रक्षणकर्ता ….. मायबाप सरकारने तुला नव्या लाटेत सोडले आहे वा-यावर… तुझा ईएमआय, तुझा घरखर्च आणि तुझे लाईटबिल तुच पहा….अशा प्रकारे ट्विटच्या माध्यमातून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारला शाब्दिक चिमटा घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिवाराची जबाबदारी घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारमालकांची व्यवस्थित काळजी घेतली आहे. सामान्य माणसा तू तुझ्या कुटुंबाची जबाबदारी घे. वसुली सरकारवर विसंबून राहण्यात कोणताही अर्थ नाही. वसुली सरकारमध्ये पोलिसात वाझे तर लस द्यायला फरहान अख्तर लाडका असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले आहे. सामान्य माणसा तूच तुझा वाली आहे असे केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे देखील वाचा ……

म्हैस दोन वेळा दूध देते – कृपाशंकर सिंग

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील कडक निर्बंध 31 मे पर्यंत वाढवले आहे. ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here