सैनिकाचा मृतदेह आढळला विहिरीत

जळगाव : पिंप्रीहाट ता. पाचोरा येथील रहिवासी असलेला व सुटीवर घरी आलेल्या सैनिकाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना आज सकाळी पाचोरा तालुक्यात उघडकीस आली. आखतवाडे शिवारातील विहीरीत ही घटना उघडकीस आल्यामुळे पाचोरा तालुक्यात खळबळ माजली आहे.

प्रमोद दिनकर पाटील (25) असे या सैनिकाचे नाव आहे. देवळाली (नाशिक ) येथील आर्मी ट्रेनिंग कॅंम्पमधे पी.टी.मास्तर म्हणून प्रमोद पाटील याची नियुक्ती झाली होती. गेल्या 26 फेब्रुवारी प्रमोद पाटील हा विवाहबद्ध झाला होता. सैनिक प्रमोद पाटील यांनी आत्महत्या केली अथवा पाय घसरुन ते पडले याबाबत तपशील समजू शकला नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here