तिन हजारासाठी बापाने मुलाशी वाद घातला —– माईकच्या वायरने त्याचा गळाच आवळला

मयत मोहंमद सलीम

शेगाव : शेख कासम शेख गफुर याचा स्वभाव खुनशी होता. त्याला जे हवे असायचे ते कुठल्याही परिस्थीत आपल्याला मिळावे यासाठी तो कुठल्याही थराला जात असे. त्याच्या स्वभावामुळे त्याला घरात व समाजात कोणत्याही प्रकारचे स्थान नव्हते. त्याच्या मुलीचे लग्न ठरले असतांना देखील त्याला घरात कुणी विचारत नव्हते. शेख कासम याचा मुलगा मोहंमद सलीम हा मौलाना होता. त्याला समाजात चांगले स्थान होते. तो गेल्या काही दिवसापासून रमजान महिन्याची तरावीची नमाज पठण करण्यासाठी सैलानी येथे गेला होता. 17 मे रोजी घरात मोहंमद सलीम याच्या बहिणीचे लग्न होते. घरातील सर्व सदस्य लग्नाच्या तयारीत लागले होते. सैलानी येथून नमाज पठण करुन आल्यावर मौलाना मोहंमद सलीम हा देखील बहिणीच्या लग्नाच्या तयारीला लागला होता. मात्र घरातील कर्ता पुरुष म्हणवला जाणारा शेख कासम हा सर्वांना जणू काही अडसर होता. तो त्याचा खुनशी स्वभाव बदलण्यास तयार नव्हता. त्यामुळे तो घरातील कर्ता असून देखील सर्वजण त्याच्यापासून चार हात लांब राहणे योग्य समजत होते.

घरात मुलीचे लग्न जवळ आले असतांना देखील शेख कासम याने घरात एक विघ्न आणले होते. मौलाना असलेल्या आपल्या मुलाजवळ तो गेल्या काही दिवसांपासून तिन हजार रुपयांची मागणी करत होता. मोहंमद सलिम हा बापाची तिन हजार रुपयांची मागणी पुर्ण करु शकत नव्हता. त्याने तसे स्पष्टपणे बापाला नकार दिला होता. तरीदेखील त्याची मोहंमद सलीमकडे तिन हजार रुपयांची मागणी सुरुच होती. तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर मोहंमद सलीम हा सैलानी येथून नमाज पठण करुन घरी परत आला होता. त्याला आपल्या बहिणीच्या लग्नाची काळजी होती.

संशयीत आरोपी

बाप शेख कासम आपल्याला तिन हजार रुपयांसाठी आज पुन्हा त्रास देईल हे लक्षात घेत मोहंमद सलीम त्याच्यापासून चार हात लांब रहात होता. रात्रीच्या वेळी मोहंमद सलीम हा गुपचूप गरिब नवाज मशिदीत लपून बसला. मात्र त्याच्या प्रत्येक हालचालीवर त्याच्या बापाची नजर होती. तो त्याच्या मागावरच होता. तिन हजार रुपये मिळत नसल्यामुळे तो रात्रीच मोहंमद सलीम याचा मागोवा घेत मशीदीत गेला. त्याठिकाणी त्याने पुन्हा मुलाला तिन हजार रुपयांची मागणी सुरु केली. या झटापटीत मुलाचा नकार ऐकल्यानंतर संतापलेल्या शेख कासम याने जवळच पडलेल्या माईकच्या वायरने मोहंमद सलीम याचा गळा आवळला. गळ्याला माईकच्या वायरचा फास करकचून आवळला जाऊ लागला. त्यामुळे मोहंमद सलीम काही वेळातच गत:प्राण झाला. तो अल्लाला प्यारा झाला.

16 मे रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास अजान देण्यासाठी सबद वली सय्यद मेहबुब गेले. त्यावेळी त्यांना मोहंमद सलीम हा झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही केल्या उठत नव्हता. त्याचा श्वासोश्वास देखील बंद पडल्याचे त्यांना आढळून आले. इतर नागरिकांच्या मदतीने सबद वली यांनी त्याला उठवण्याचा पुन्हा प्रयत्न केला. तो मयत झाला असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्याच्या  मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्याच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण दिसून आले.

या घटनेची माहिती तातडीने शेगाव शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच शेगाव शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. सतोष टाले व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक नितिन इंगोले व कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेची माहिती गावात व परिसरात वा-यासारखी पसरण्यास वेळ लागला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांनी परिसरात तोबा गर्दी केली. पोलिस पथकाने मोहंमद सलीम याचा मृतदेह पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणीकामी रुग्णालयात रवाना केला. या घटनेप्रकरणी मयत मोहंमद सलीम याच्या आईने शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती व संशयीत आरोपी शेख कासम शेख गफुर याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा  दाखल करण्यात आला. संशयीत शेख कासम हा घटना घडल्यापासून फरार झाला होता. त्याच्या घरात दुस-याच दिवशी 17 मे रोजी मुलीचे लग्न होते. या घटनेमुळे लग्नात बाधा आली.

संतोष टाले (पोलिस निरीक्षक)

गुन्हा दाखल होत असतांनाच पो.नि. संतोष टाले यांनी आपल्या सहका-यांना फरार शेख कासम याच्या मागावर रवाना केले होते. फरार शेख कासम हा बाळापुर येथे असल्याची गुप्त माहीती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला जेरबंद करण्यात आले. रागीट व खुनशी स्वभाव असलेला शेख कासम याने एप्रिल महिन्यात घरात वाद घातला होता. यावेळी त्याने घरातील सदस्यांच्या हातावर ब्लेडने वार केले होते. आता तो मुलाकडे तिन हजारासाठी तगादा लावत होता. या तगाद्यातूनच त्याच्या हातून मुलाचा खून झाला. घटनेच्या वेळी तो मुलाच्या छातीवर बसला व त्याने माईकच्या वायरने त्याचा गळा आवळला. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here