पो.हे.कॉ. जितेंद्र तायडे यांच्याविरुद्ध प्रलंबीत गुन्ह्यांबाबत गुन्हा दाखल

जळगाव : पाचोरा पोलिस स्टेशन येथून एरंडोल पोलिस स्टेशनला बदली झालेले पोलिस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तायडे यांच्यावर प्रलंबीत गुन्ह्यांबाबत पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदली झाल्यानंतर देखील तपासावर प्रलंबित असलेले गुन्हे, अकस्मात मृत्युचे गुन्हे हे.कॉ. जितेंद्र तायडे यांनी पाचोरा पोलिस स्टेशनला जमा केले नाही. गुन्ह्यातील आरोपींना फायदा व्हावा तसेच अकस्मात मृत्यूमधील मयताच्या मृत्युचे कारण उघड होऊ नये या गैरहेतून हे.कॉ. जितेंद्र तायडे यांनी गुन्ह्यांचे कागदपत्र स्वत:जवळ ठेऊन घेतल्याचा आरोप आहे. तशी पो.नि. किसरनराव नजनपाटील यांची खात्री झाल्याने त्यांच्या आदेशाने हे.कॉ. शामकांत पाटील यांच्या फिर्यादीने सदर गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा पोलिस स्टेशनला यापुर्वी नेमणूकीस असलेले हे.कॉ. जितेंद्र तायडे यांना एरंडोल पोलिस स्टेशनला बदली झाल्यामुळे ऑक्टोबर 2020 मधे सोडण्यात आले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिलकुमार शिंदे यांनी हे.कॉ. जितेंद्र तायडे यांना त्यांच्याकडे असलेल्या प्रलंबीत गुन्ह्यांची निर्गती करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक श्री. किसनराव नजनपाटील यांनी दि. 05/11/2020 रोजी पाचोरा पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणुन चार्ज घेतला. त्यानंतर पो.नि. किसनराव नजनपाटील यांनी गुन्ह्यांचा आढावा घेतला असता हे.कॉ. जितेंद्र उत्तम तायडे यांच्याकडे प्रलंबीत गुन्हे असल्याचे आढळून आले. याबाबत हे.कॉ. जितेंद्र तायडे यांच्याविरुद्ध भा.द.वि.कलम 166, 217 प्रमाणे रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here