आधी चित्रीकरण नंतर व्हायचे सादरीकरण! — पैशांच्या मोहात चौकडीचे नव्हते वर्गीकरण!!

अहमदनगर : हनी ट्रॅपमधे अडकलेला क्लासवन अधिकारी हा अहमदनगर तालुक्यातील हमीदपुर येथील रहिवासी असल्याचे म्हटले जात आहे. जखणगाव येथे हनीट्रॅप टोळीचे कारनामे अहमदनगर तालुका पोलिसांनी उघड केल्यानंतर आरोपींचे कारनामे उघड होत आहेत.

कमी श्रमात अधिकाधिक पैसे मिळवण्याच्या हव्यासातून अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवण्याच्या उद्योगात महिलेने टोळी तयार केली होती. त्या टोळीत महेश बागले, सागर खरमाळे, साचिन खेसे, अमोल मोरे या चांडाळ चौकडीचा समावेश होता. चटोर वृत्तीचे क्लासवन अधिकारी अथवा बड्या धनिकांवर सौंदयासह मोहाच्या दुहेरी जाळ्यात अडकवण्याचे काम महिला करत होती. एकदा का बडा मासा बंगल्यात आला म्हणजे त्याच्याशी लगट करुन त्याला शरीरसंबंध ठेवण्यास ती महिला भाग पाडत होती. जिन्यात आणि बाथरुममधे लपून – टपून बसलेले तिचे सहकारी या घटनेचे अश्लिल व्हिडीओ चित्रीकरण चोरुन लपून करत होते. त्यानंतर पुढील टप्प्यात त्या चित्रीकरणाचे सादरीकरण करुन त्याच्याकडून दमदाटीसह मारहाणीने पैसे उकळण्याचा अर्थात लुटमारीचा पुढील टप्पा पार पाडला जात होता. या सर्व टप्प्यांची जबाबदारी महिलेने या तरुणांकडे सोपवली होती.  

अहमदनगर तालुका पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यात महेश बागले व सागर खरमाळे यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. केडगाव येथे किराणा दुकान चालवणारा अमोल मोरे हा आरोपी महिलेचा जवळचा सहकारी समजला जातो. अमोल मोरे प्रमाणेच सचिन खेसे हा देखील हमीदपुर येथे किराणा दुकान चालवतो.  या क्लासवन अधिका-या प्रमाणेच इतरही धनिक या महिलेचे शिकार ठरलेले आहेत. मात्र पैशांपेक्षा प्रतिष्ठा जपण्यासाठी ते पुढे येण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे. उलट जे लोक या महिलेसह तिच्या साथीदारांकडून खंडणी प्रकरणी शिकार झाले आहेत त्यांनी पुढे येण्याचे आवाहन तपास अधिकारी राजेंद्र सानप यांनी केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here