चौघे पोलिस अधिकारी मुंबईबाहेर – केदारी पवार जळगावला

मुंबई : मुंबई पोलिस दलात फेरबदल करण्यात आले असून चार अधिका-यांची बदली मुंबईच्या बाहेर करण्यात आली आहे. वर्सोवा पोलिस स्टेशनला असलेले पोलिस निरीक्षक केदारी पवार यांची जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र चाचणी समितीत बदली करण्यात आली आहे. अचानक चौघा पोलिस अधिका-यांच्या मुंबईच्या बाहेर बदल्या केल्यामुळे पोलिस दलात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बदली झालेल्या इतर तिघा पोलीस निरीक्षकांमधे सुधीर दळवी, नंदकुमार गोपाळे आणि सचिन कदम यांची नावे आहेत.

देवनार पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सचिन कदम यांची बदली औरंगाबादला टीआरटीआय कार्यालयात करण्यात आली आहे. पार्कसाईट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. सुधीर दळवी यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नानाविज येथे बदली करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धमकी प्रकरण, उद्योजक मनसुख हिरे यांचा मृत्यू, सचिन वाझे यांचे गाजत असलेले प्रकरण यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडल्यानंतर मुंबई पोलिस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 65 पोलिस अधिका-यांचा बदल्या झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here