1 जून नंतर लॉकडाऊनचा सस्पेंस कायम !

uddhav thackeray

रत्नागिरी : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेला लॉकडाऊन 1 जून पर्यंत आहे. आज रत्नागिरी दौ-यावरील मुख्यमंत्र्यांसमवेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यासमवेत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना 1 जून नंतर लॉकडाऊनबाबत काय धोरण राहील? लॉकडाऊन उठवला जाणार किंवा काय? याबद्दल विचारणा केली.

प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी आपली भुमिका स्पष्टपणे उघड न करता सस्पेंस जणू काही कायम ठेवला आहे. ते म्हणाले की देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने कहर केला आहे. मुंबईसह ठाणे, पुणे व इतर अनेक शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होतांना दिसत आहे. असे असले तरी कोरोनामुळे होत असलेल्या मृत्युदराची संख्या चिंताजनक आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत वाईट परिस्थिती असल्याचे लक्षात घेत आपण काही निर्बंध शिथील करु. आपल्याला सुरक्षेचे नियम पाळावे लागतील. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी नंतर निर्णय घेऊ. कुणी गाफील राहू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here