लॉक आणि अनलॉक बाबत आघाडी सरकारने केला संभ्रम

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील 18 जिल्ह्यांची यादी जाहीर करत ते जिल्हे पुर्णपणे अनलॉक केले जात असल्याची घोषणा केली. मात्र काही क्षणातच सरकारी प्रेस नोट नुसार जाहीर करण्यात आले की अनलॉकचा प्रस्ताव असून निर्णय नाही. यामुळे शासनातील समन्वयाचा अभाव दिसून आला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था झाली असल्याचा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधे कुणाचा कुणाशी ताळमेळ नसून अंधेर नगरी चौपट राजा अशी या सरकारची अवस्था असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारच्या अशा यु टर्न मुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. विजय वडेट्टीवारांनी पत्रकार परिषद घेत परस्पर घोषणा केली काय? मुख्यमंत्र्यांना या पत्रकार परिषदेची काहीच कल्पना नव्हती काय? राज्य सरकारमधे लॉकडाऊन आणि अनलॉक बाबत एकवाक्यता नसल्याचे एकंदरीत दिसून आल्याचे आता जनताच बोलू लागली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here