जुन्या वादातून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण

जळगाव : जुन्या वादातून चौघांनी तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार 10 जुन रोजी घडला होता. आपल्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिसात गेल्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तक्रारदार तरुणाला पुन्हा मारहाण केल्याचा प्रकार आज मध्यरात्री घडला. या मारहाणीच्या घटनेबद्दल जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिहान खान फिरोज खान (24) रा. मासुमवाडी जळगाव या तरुणासोबत असलेल्या जुन्या वादातून अविनाश रामेश्वर राठोड, गण्या (पुर्ण नाव माहीत नाही) व इतर दोघांनी मारहाण व शिवीगाळ करत धमकी दिली होती. या घटनेबद्दल रिहान खान याने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली होती. तक्रार दिल्यानंतर घरी परत जात असतांना मध्यरात्री बारा वाजेनंतर त्याला वाटेत मासुमवाडीजवळ टोळक्याने घेरले. त्यात अविनाश रामेश्वर राठोड (रामेश्वर कलनी जळगाव), गण्या (पुर्ण नांव माहीत नाही), फारुख शेख अजीज (तांबापुरा जळगाव), सचिन कैलास चौधरी (इश्वर कॉलनी जळगाव), वाजिद खान हमीद खान (मासुमवाडी जळगाव), निखील मनोहर सोनार (सम्राट कॉलनी जळगाव), शुभम भगवान माळी (सम्राट कॉलनी जळगाव), जुनेद सादीक शेख (मासुमवाडी जळगाव), आकाश अजय सोनार (लक्ष्मी नगर जळगाव) यांनी अडवले.

तु आमच्या विरुध्द पोलिस स्टेशनला तक्रार का तक्रार दिली? असा जाब रिहान यास अविनाश राठोड याने विचारला. त्यानंतर त्याला सर्वांनी मिळून चापटा बुक्कांनी मारहाण केली. दरम्यान अविनाश राठोड याने रिहानच्या कमरेवर चाकूने मारले. या घडामोडी दरम्यान पोलिसांचे वाहन आल्यामुळे सर्वजण घटनास्थळावरुन पळून गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्याकामी सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर शोध मोहिम राबवण्यात आली. या घटनेतील अविनाश रामेश्वर राठोड (रामेश्वर कॉलनी जळगाव), गणेश भास्कर सोनार (लक्ष्मी नगर जळगाव) यांच्यासह एकुण नऊ आरोपींना रात्रीच ताब्यात घेण्यात आले. या शोध मोहीमेत पो.हे. कॉ. गफ्फार तडवी, राजेंद्र कांडेकर, महेंद्रसिंग पाटील, गोविंदा पाटील, चेतन सोनवणे, किशोर पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. पोलिस पथकाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य तणाव निवळला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here